विद्यार्थ्यांनी पाणी पिण्यासाठी केरळमधील शाळेत वाजवली जाते ‘वॉटर बेल

केरळमधील सरकारी शाळांनी मुलांना आजारापासून वाचवण्यासाठी एक नवीन अभियान सुरू केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी वॉटर ब्रेक देण्यात येतो. एवढेच नाही तर यासाठी दिवसातून तीनदा बेल देखील वाजवली जाते. याला वॉटर बेल असे नाव देण्यात आलेले आहे.

बेल वाजल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला पाणी प्यायचे असते. पहिली बेल सकाळी 10.35 ला वाजते. त्यानंतर दुपारी 12 आणि 2 वाजता बेल वाजवली जाते. हा वॉटर ब्रेक 15 ते 20 मिनिटांचा असतो. तामिळनाडू आणि केरळमधील अनेक शाळा ही पद्धत सुरू करू लागले आहेत. कर्नाटकचे शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी देखील याबाबत निर्देश दिले आहेत.

एका रिपोर्टनुसार, पाण्याची कमतरता आणि डीहायड्रेशनमुळे अनेक मुलं आजारी पडतात. पाणी न पिल्यामुळे मुलं आजारी पडतात.

Leave a Comment