सेवानिवृत्तीनंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना देण्यात येणार झेड प्लस सुरक्षा


नवी दिल्ली – आता सेवानिवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. येत्या 17 नोव्हेंबरला रंजन गोगोई यांचा कार्यकाळ संपत आहे. अयोध्या राम जन्मभूमी वादाबाबत त्यांच्या खंडपीठासमोर गेल्या आठवड्यात सुनावणी पार पडली. तर रंजन गोगोई यांना सेवानिवृत्तीनंतर आसाम पोलिसांना डिब्रुगढ स्थित पैतृक आवास आणि गुवाहाटी मधील दुसऱ्या घराच्या सुरक्षिततेसाठी आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत माहिती देत आसाम मधील पोलिसांनी सांगितले की, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून रंजन गोगोई यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात यावी आणि त्यानुसार गोगोई यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. त्यामुळे गोगोई यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक सोय उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. रंजन गोगोई सेवानिवृत्तीनंतर गुवाहाटी येथे राहण्यास जाणार आहेत.

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, मंत्रालयाच्या कोणत्याही व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत व्यक्तीगत टिप्पणी करणार नाही. तर रंजन गोगोई यांच्यासह त्यांच्या खंडपीठातील अन्य चार न्यायाधीशांच्या सुरक्षिततेत सुद्दा वाढ करण्यात येणार आहे. गोगोई यांना सर्वोच्च श्रेणीतील सुरक्षा दिली असून अन्य न्यायमुर्तींना सुद्धा विविध श्रेणीनुसार सुरक्षा पुरवली जाणार आहे.

Leave a Comment