
सोशल मीडियावर आपले नवनवीन हॉट फोटो शेअर करुन बॉलीवूडची बिनधास्त गर्ल दिशा पटनी कायम चर्चेत असते. खासकरून ती इंस्टाग्रामवर कायम आपले बिनधास्त फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंना दिसायला सुंदर आणि कमनीय बांधा असल्याने कायम तुफान प्रतिसाद मिळतो आणि तिचे चाहते देखील तिचे फोटो एन्जॉय करत असतात. ती अनेकदा अशा फोटोंमधून जाहिरातही करत असते. नुकताच एक फोटो दिशाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिचा गुलाबी खास ड्रेसमधील हा फोटो व्हायरल झाला असून 15 लाखांपेक्षा जास्त जणांनी त्याला लाईक केले आहे.
दिशा पटनीच्या व्हायरल फोटोवर टायगरच्या बहिणीची प्रतिक्रिया
दिशा या फोटोत स्मितहास्य करताना दिसत असून यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. टायगर श्रॉफची बहिण कृष्णानेही तिचा हा फोटो पाहून तिचे कौतुक केले आहे. तु या फोटोत खूप सुंदर दिसत आहेस अशी कमेंट कृष्णाने केली आहे तर त्याला दिशाने धन्यवाद म्हणून उत्तरही दिले आहे.
नुकतचे आपले यूट्यूब चॅनलही दिशाने लाँच केला आहे. ती त्यावरही आपले व्हिडीओ सातत्याने टाकत असते. बॉलिवूडमध्ये कायम टायगर आणि दिशाच्या अफेअर्सची चर्चा होत असते. ते दोघे अनेक कार्यक्रमांमध्येही हातात हात घालून दिसले आहेत. तर त्या दोघांना अनेकदा रेस्टॉरेंट्समध्येही पाहण्यात आले आहे. दिशाने टायगर श्रॉफसोबत बागी-2 चित्रपटानंतर सलमानच्या भारत चित्रपटात काम केले. त्यात सलमानच्या बहिणीची भूमिका दिशाने केली होती. सलमानसोबत काम केल्यानंतर दिशाला आणखी चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या.
