या देशाची अल्पवयीन मुलांच्या ऑनलाईन गेम खेळण्यावर बंदी

चीन सरकारने मोठा निर्णय घेत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ऑनलाईन गेम खेळण्यास बंदी घातली आहे. सरकारने ऑनलाईन गेम खेळण्यास प्रतिबंध घालताना रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत गेम खेळण्यास मनाई केली आहे. याशिवाय आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवशी केवळ 3 तास गेम खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मोबाईलवरील व्हिडीओ गेम आणि ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे लहान मुलांना अनेक समस्या होत आहेत. अनेक मुलांची मान दुखत आहे, तर काहींचे डोळे खराब होत आहेत. याशिवाय मुलांना पाठ दुखीचा देखील त्रात्र जाणवत आहे. अमेरिकेपाठोपाठ चीन जगातील सर्वात मोठे गेमिंग बाजार आहे.

चीनी सरकार नवीन नियमांनुसार, 8 ते 16 वर्षांची मुले ऑनलाईन गेम्सवर प्रत्येक महिन्याला 200 युआन (जवळपास 2 हजार रुपये) खर्च करु शकतात. तर 16 ते 18 वयोगटातील मुले गेमिंगवर 400 युआन (जवळपास 4 हजार रुपये) खर्च करू शकतात. याशिवाय ऑनलाईन गेम खेळण्यासाठी मुलांना स्वतःच्या खऱ्या नावाने रजिस्ट्रेशन करावे लागेल.

Leave a Comment