‘गगनयान’ मिशनसाठी 12 संभावित प्रवाशांची निवड

भारताचे अंतराळातील मानवी मिशन ‘गगनयान’साठी 12 संभावित प्रवाशांची निवड करण्यात आली आहे. हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया यांनी याबाबत माहिती दिली. बंगळुरू येथे आयोजित इंडियन सोसायटी फॉर एअरोस्पेस मेडिसिनच्या (आयएसएएम) 58 व्या वार्षिक समेंलनाच्या उद्घाटन सत्रात बोलत असताना भदोरिया यांनी ही माहिती दिली.

भारतीय हवाईदलाच्या भूमिकेविषयी भदोरिया यांनी सांगितले की, इस्त्रोसोबत समन्वय सुरू असून, अंतराळयानाच्या डिझाईनविषयी काम सुरू आहे. यातील जीवन सुरक्षा प्रणाली, कॅप्सूलचे डिझाईन व इतर आरोग्यविषयक गोष्टी ठरविण्यात येत आहे. जेणेकरून इस्त्रो आव्हानांचा सामना करून यश प्राप्त करू शकेल.

समेंलनात संबोधित करताना हवाईदलाचे वैद्यकीय सेवेचे महासंचालक एअर मार्शल एमएस बुटोला यांनी सांगितले की, गगनयानसाठी प्रवाशांच्या निवडीचा पहिला टप्पा पुर्ण झाला आहे. निवड करण्यात आलेल्या पायलट्सना रशियामध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे.

एका अधिकाऱ्यांनुसार, हवाईदलाच्या 12 जणांना गगययान मिशनसाठी संभावित प्रवासी म्हणून निवडण्यात आले आहे. यातील 7 जणांना प्रशिक्षणासाठी रशियाला पाठवण्यात आले आहे.  भारताचे पहिले मानवी मिशन गगनयान डिसेंबर 2021 पर्यंत प्रेक्षपित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे.

सुरूवातीला अंतराळ प्रवासासाठी वयाची सीमा 30 निश्चित करण्यात आली होती. मात्र या वयोगटातील एक पायलट प्रशिक्षण चाचणी पुर्ण करू न शकल्याने वयाची अट 41 वर्ष करण्यात आलेली आहे.

Leave a Comment