झोपा पण व्यवस्थित


आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्याकरिता चांगल्या पौष्टिक आहारा बरोबरच, नियमित व्यायाम आणि साधारण आठ तासांची शांत झोप हे ही आवश्यक आहे. रात्रीची झोप चांगली झालेली असली की पुढचा सर्वच दिवस उत्साहात आणि आणि आनंदात जातो. पण जर रात्रीची झोप काही कारणाने अपूर्ण असली तर मात्र पुढचा सर्वच दिवस तितकासा चांगला जात नाही. एक तर पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे थकवा दूर झालेला नसतो, कामाचा आळस येतो, आणि त्यामुळेच कुठल्याच कामामध्ये उत्साह वाटत नाही. रात्री झोप व्यवस्थित न होण्याची अनेक करणे असू शकतात. एखाद्या कामाचे टेन्शन, खाणे व्यवस्थित झालेले नसणे किंवा अति झालेले असणे वगैरे. या सगळ्या कारणांशिवाय अजून एक लक्षात घेण्यासारखे कारण म्हणजे आपल्या झोपेची पोझिशन ठीक नसणे, हे आहे. आपल्या झोपेची पोझिशन ठीक नसेल तर झोपेमध्ये असताना आपल्याला तसे जाणवत नाही, पण दुसऱ्या दिवशी मान अवघडणे, अंगदुखी, असले त्रास जाणवायला लागतात. त्यामुळे झोपण्यासाठी कुठली पोझिशन चांगली याचा विचार करायला हवा.

पाठीवर झोपणे : पाठीवर झोपल्याने शरीराचे वजन नीट सर्व बाजूने balance केले जाते. आपले डोके, मान आणि पाठीचा कणा न्युट्रल पोझिशन ला असतात. त्यामुळे पाठीवर झोपणाऱ्या व्यक्तींना पाठदुखी किंवा मानदुखीचा होण्याची फारशी शक्यता नसते. मात्र पाठीवर झोपणार असाल तर खूप जाड उशी घेण्याचे टाळावे. एखादी उशी गुडघ्यांच्या खाली ठेवल्यास पाठीच्या कण्याला आधार मिळण्यास मदत होते. मात्र घोरण्याची सवय असणाऱ्या मंडळींनी पाठीवर झोपणे टाळावे.

कुशीवर झोपणे : कुशीवर, पाय पोटाशी थोडे जवळ घेऊन झोपल्याने पाठीच्या कण्यावर येत असलेला ताण कमी हिण्यास मदत मिळते. डाव्या कुशीवर झोपल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते. कुशीवर झोपल्याने फुफ्फुसांना हवेचा पुरवठा व्यवस्थित होतो. गर्भारशी बायकांनी कुशीवर झोपावे असा सल्ला त्यांना दिला जातो कारण त्यामुळे गर्भाशयाकडे रक्ताचा पुरवठा चांगला होतो. मात्र कुशीवर झोपताना डोक्याखाली हात घेऊन झोपायची सवय असल्यास ती टाळावी. कारण अश्यावेळी हातांच्या स्नायूंवर आणि पेशींवर ताण येऊन हात दुखू शकतो.

पोटावर. पालथे झोपणे : झोपण्यासाठी ही पोझिशन तितकीशी योग्य समजली जात नाही. पालथे झोपल्यामुळे शरीरातील स्नायंवर ताण पडू शकतो, ज्या मुले अंगदुखी, हात किंवा पाय जड होणे अअसे प्रकार घडू शकतात. शरीरामधील रक्ताभिसरण ही पालथे झोपल्यामुळे व्यवस्थित होऊ शकत नाही. क्वचित मान दुखण्याची शक्यता असते. मात्र जी मंडळी झोपताना घोरतात त्यांच्या साठी ही पोझिशन योग्य आहे.

Leave a Comment