‘पानिपत’मधील अजय-अतुलने संगीतबद्ध केलेले गाणे रिलीज


दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाचे पर्व असलेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यापूर्वी नुकतेच या चित्रपटातील पहिलं गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल ‘मर्द मराठा’ असे असून १३०० नर्तक यामध्ये एकाच वेळी थिरकले आहेत. मराठमोळा साज अजय-अतुलने संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात अनुभवायला मिळत आहे.

या गाण्यात मराठी आणि हिंदी भाषेचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटातील काही कलाकारांचे लक्षवेधी लूक काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. अर्जुन कपूर, मोहनीश बहल, पद्मिनी कोल्हापुरे, कृती सनॉन हे कलाकार राजू खान यांनी नृत्यदिग्दर्शित केलेल्या या गाण्यात तब्बल १३०० नर्तकांसोबत पाहायला मिळत आहेत. १३ दिवसांचा काळ हे भव्यदिव्य गाणे चित्रीत करण्यासाठी लागला. कर्जत येथे या गाण्याचे चित्रीकरण पार पडले. यासाठी कर्जतमध्ये शनिवारवाड्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती. अजय-अतुलसोबत कुणाल गांजावाला, सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर, पद्मनाभ गायकवाड आणि प्रियांका बर्वे यांनी हे गाणे गायले आहे.

Leave a Comment