एचपीचा 24.5 तास बॅटरी बॅकअप असणारा टू-इन-वन ड्रॅगनफ्लाय लॅपटॉप बाजारात दाखल

एचपीने आपल्या इलाइट सीरिजमधील नवीन ड्रॅगनफ्लाय लॅपटॉप लाँच केला आहे. हा टू-इन-वन लॅपटॉप असून, याचे वजन 1 किलो आहे. भारतीय बाजारात याची किंमत 1,49,990 रुपये आहे. यामध्ये 13.3 इंच स्क्रीन देण्यात आलेली आहे.

(Source)

कंपनीने दावा केला आहे की, सिंगल चार्जमध्ये हा लॅपटॉप 24.5 तास चालेल. यामध्ये 8th  जनरेशन इंटेल कोर वीप्रो प्रोसेसर देण्यात आला आहे.

(Source)

या लॅपटॉपमध्ये 13.3 इंच स्क्रीन देण्यात आली असून, ज्यात 4के डिस्प्ले रिज्योल्यूशन सपोर्ट आहे. यामध्ये 16 जीबी पर्यंत रॅम आणि 2 टीबी स्टोरेज मिळेल. यामध्ये किती एमएएचची बॅटरी आहे, याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही.मात्र 30 मिनिटात हा लॅपटॉप 50 टक्के चार्ज होतो. या लॅपटॉपमध्ये वाय-फाय 6 कनेक्टिविटी, 4X4 एलटीई एंटीना आणि प्री इंस्टॉल पर्सनल व्हॅलबिइंग सॉफ्टेवअर मिळेल.

Leave a Comment