डुक्कराच्या मदतीने या विमानतळावर तणाव दूर करण्यासाठी देण्यात येते थेरपी

डुक्कर उडू तर शकत नाही, मात्र सॅन फ्रॅन्सिस्कोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एक डुक्कर उड्डाण घेणाऱ्या प्रवाशांचा तणाव दूर करण्यास मदत करत आहे. 5 वर्षीय LiLou नावाचे छोटे डुक्कर आणि त्याचे मालक तात्याना डॅनीलोवा हे सॅन फ्रँसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वॅग ब्रिगेडचा भाग आहेत. हा प्रोग्राम प्राणी थेरपीद्वारे प्रवाशांचा तणाव दूर करतो व त्यांच्या प्रवासाची चिंता दूर करते.

पायलटची टोपी घातलेले आणि नखांना लाल रंगाचे नेलपेंट लावलले हे छोटे डुक्कर विमानतळावर प्रवाशांचे स्वागत करत आहे, त्यांच्याबरोबर सेल्फी काढत आहे.

(Source)

डुक्करच्या मालकाने सांगितले की, लोक आपल्या प्रवासापासून काही मिनिटे ब्रेक घेऊन खूपच आनंदी होतात. काही सेंकदा थांबून लोक आनंदाने त्याच्याकडे बघतात.

विमानतळावर छोटे डुक्कर आणि त्याचे मालक आपल्या सॅन फ्रँसिस्कोमध्ये राहतो. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना देखील हे छोटे डुक्कर आवडत आहे.

Leave a Comment