काँग्रेससोबतच्या बैठकीबाबत शरद पवारांचे धक्कादायक उत्तर


मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यात वाद झाला आणि अखेर सत्ता स्थापनेसाठी भाजपने असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यात ऐतिहासिक महाआघाडी होणार अशी चर्चा होती. पण शिवसेनेला त्यातही अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीकडून पाठिंब्याचे पत्र मिळाले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आता हेच पत्र आरोप प्रत्यारोपाचे काऱण बनले आहे. पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की आम्ही पत्राची वाट बघत होतो पण त्यासाठी काँग्रेसकडून उशीर झाला. पण पत्र काही मिळाले नाही आणि एकट्या राष्ट्रवादीला सरकार स्थापन करणे शक्य नाही. काँग्रेससोबत असेल तरच काहीतर करता येईल असेही ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील बैठकीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. शरद पवार म्हणाले की, तुम्हाला कोण म्हणाले आमची बैठक आहे? याची माहिती तर मला देखील नाही. शरद पवारांच्या या विधानामुळे काँग्रेस राष्ट्रवादीतही आता बिनसले की काय अशी चर्चा रंगली आहे.

काँग्रेसच्या कोअर कमिटीची दिल्लीतील बैठक रद्द झाली आहे. राज्यातील काँग्रेस नेते या बैठकीला उपस्थित राहणार होते. सेनेशी पवारांची चर्चा झाली नसल्यामुळे सोनिया गांधींकडून असा निर्णय घेतला गेल्याचे म्हटले जात आहे. यातच अजित पवार यांनीही पत्र मिळण्यास काँग्रेसमुळे उशीर झाला असे म्हटले जात आहे.

राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रवादीला संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत वेळ दिला आहे. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंसोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी सेनेचा पाठिंबा घेऊन काँग्रेससोबत सरकार स्थापनेच्या हालचाली करणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment