सलमानच्या दबंग -3मध्ये आता मुन्नीच्या जागी बदनाम होणार ‘मुन्ना’


बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या आगामी दबंग 3 या चित्रपटातील ‘मुन्ना बदनाम हुआ’ हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. सोशल मीडियावर त्याच्या या गाण्याने देखील धुमाकूळ घातला असून चाहत्यांनी सलमानचे हे गाणेही डोक्यावर घेतल्यामुळे हे गाणेही आता गाजण्याची शक्यता आहे. याआधीच्या दबंगमधील मुन्नी बदनाम हुई हे गाणे देशभर प्रचंड गाजले होते. सलमानचा दबंग 2010मध्ये रिलीज झाला होता. यातील ‘मुन्नी बदनाम हुई’ हे उडत्या चालीवरच्या आयटम साँगने तरुणाईला आपल्या तालावर थिरकवले होते. त्याचप्रमाणे आताही होण्याची शक्यता आहे. तरुणाईचा 4 मिनिट आणि 6 सेकंदांच्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हे गाणे दानिश शबरीने लिहिले असून ते ममता शर्मा, कमाल खान आणि बादशाह यांनी गायले आहे. तर या गाण्याला साजिद वाजिद यांनी संगीत दिले आहे. हे गाणं आल्यानंतर युट्यूबवर लाखो लोकांनी ते ऐकले आहे. बारामती परिसरात अभिनेता सलमान खान याच्या ‘दबंग 3’ या चित्रपटाचे शूटिंग झाले होते. सलमान खानला पाहण्यासाठी यावेळी तरुण वर्ग आणि त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या गावात बॉलिवूडचा दबंग खान आल्याची बातमी पसरल्यानंतर आवडत्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी तरुण अक्षरश: घरांच्या छतावर, इमारतींवर चढले होते.

Leave a Comment