दिलेले टार्गेट वेळेत पुर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे बॉसने धुतले पाय


केवळ कामापुरतेच कर्मचारी आणि बॉस यांचे नाते असते. पण फार क्वचितच कर्मचाऱ्यांचा बॉस मित्र होऊ शकतो. याचे ताजे उदाहरण सध्या समोर आले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेण्यासाठी एक बॉस काहीही करू शकतो. पण कधी तुमच्या बॉसने तुमचे पाय धुतले आहे? आता प्रश्न वाचून नक्कीच म्हणाल काय राव कायपण प्रश्न विचारता. पण असा प्रकार खरोखर घडला आहे.

चीनच्या चक्क आपल्या कर्मचाऱ्यांचे एका कंपनीमधील दोन बॉसनी पाय धुतल्याचा प्रकार घडला आहे. कंपनीला कर्मचाऱ्यांमुळे झालेला फायद्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी ही आयडिया काढली होती. आपल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी या कंपनीने त्यांना स्टेजवर बोलवून त्यांचे पाय धुतले. आम्ही हे जे काही सांगत आहोत त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

यंदाच्या वर्षात चीनच्या कॉस्मॅटिक कंपनीला दुप्पट फायदा झाल्यामुळे एका पार्टीचे कर्मचाऱ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. यावेळी चांगली कामगिरी करणाऱ्या 8 कर्मचाऱ्यांचे पाय धुवून त्यांना सन्मानित केले. ही वागणुक कंपनीच्या टॉप सेल्स अधिकाऱ्यांना दिल्यामुळे या कंपनीच्या बॉसचे जगभरातून कौतुक केले जात आहे.

यासंदर्भातील वृत्त डेली मेलने दिलेले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार 8 कर्मचाऱ्यांना कंपनीने पार्टीमध्ये स्टेजवर आमंत्रित केले. त्यांना स्टेजवर खुर्चीवर बसण्याची विनंती केली. बॉसने त्यानंतर स्वत: या कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. याबाबत कंपनीच्या मालकाने, कर्मचाऱ्यांना अवॉर्ड सर्व कंपन्या देतात. पण त्यांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही काही तरी वेगळे करण्याचा विचार केला. म्हणून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आम्ही पाय धुतल्याचे सांगितले.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर कंपनीच्या या उपक्रमाचे कौतुकही केले जात आहे. तर हा व्हिडीओ काही कर्मचाऱ्यांनी शेअर करत आपल्या बॉसला ट्रोल केले आहे. एका युझरने, कंपनीला कर्मचाऱ्यांची कदर आहे, हे पाहून आनंद झाला. कर्मचाऱ्यांचे मनोबल या सगळ्या गोष्टींमुळे वाढत असल्याचे सांगितले. तर, आणखी एक युझरने, कर्मचाऱ्यांचे पाय तर धुतले पण त्यांना बोनसही दिला पाहिजे. तरी हा सगळ्यांसाठी मोठा सन्मान असल्याचे लिहिले आहे.

Leave a Comment