अशाप्रकारे इंस्टाग्रामद्वारे कमावू शकता हजारो रूपये

भारतात सर्वाधिक प्रमाणात फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर होतो. या प्लॅटफॉर्मचा वापर व्हिडीओ, पोस्ट शेअर करण्यासाठी केला जातो. मात्र खूप कमी जणांना माहिती आहे की, इंस्टाग्रामचा वापर पैसे कमवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

जर तुम्हाला देखील इंस्टाग्रामद्वारे पैसे कमवायचे आहेत, तर यासाठी तुमच्या फॉलोवर्सची संख्या जास्त हवी. इंस्टाग्रामद्वारे पैसे कमवण्याचे दोन पद्धती आहेत. एक आहे स्पॉन्सर पोस्ट आणि दुसरी आहे एफिलिएट प्रोग्राम.

जर तुमचे इंस्टाग्रामवर 5 हजारांपेक्षा अधिक फोलोवर्स आहेत, तर तुम्ही स्पॉन्सर पोस्टद्वारे पैसे कमवू शकता. स्पॉन्सरसाठी तुम्हाला एखाद्या ब्रँडशी कनेक्ट व्हावे लागेल. त्यानंतर त्या प्रोडक्ट्ससोबत तुम्ही फोटो आणि व्हिडीओ शेअर करू शकता.

कोणत्याही ब्रँडशी कनेक्ट व्हायचे असेल तर त्यासाठी iFluenz.com वर जाऊन तुमचे अकाउंट तयार करा. याशिवाय तुम्हाला जो ब्रँड स्पॉन्सर करायचा आहे, त्याला रिक्वेस्ट पाठवा.

एफिलिएट प्रोग्रामद्वारे देखील लाखो रूपये कमवता येतात. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्स एफिलिएट प्रोग्राम लाँच करतात. यासाठी तुम्हाला ई-कॉमर्स साइटवर जाऊन रजिस्टर करावे लागेल.

रजिस्ट्रेशननंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटवर प्रोडक्टच्या फोटो आणि व्हिडीओसोबत एफिलिएट लिंक शेअर करावी लागेल. त्या लिंकद्वारे प्रोडक्ट खरेदी केल्यास, तुम्हाला तुमचे कमिशन मिळेल.

Leave a Comment