‘सैराट’च्या परशाला मिळाली रणवीर सिंहसोबत काम करण्याची संधी


आकाश ठोसर ‘सैराट’ चित्रपटात परशाची भूमिका वठवून रातोरात स्टार झाला. त्यानंतर तो आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंहसोबत काम करण्याची संधी ‘सैराट’, ‘एफ यू’ या चित्रपटांत झळकलेल्या आकाशला मिळाली आहे. सेट-वेटची जाहिरात आकाश ठोसरला मिळाली असून तो रणवीर सिंहसोबत त्यात दिसत आहे.


या जाहिरातीचा व्हिडिओ आकाशने इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. तर, रणवीर सिंहलाही ‘सदा सेक्सी रहो’ असे कॅप्शन देत टॅग केले आहे. रणवीर सिंह हा त्यांच्या नेहमीच्या हटके आणि बोल्ड लूकमध्ये या जाहिरातीत दिसत आहे.

आकाशच्या मेक ओव्हरची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. हा लूक त्याने कशासाठी केला हे मात्र अद्याप गुलदस्त्यात होते. आकाश ‘सैराट’नंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक नागराज मंजुळेंसोबत काम करणार आहे. तो मंजुळेंच्या आगामी ‘झुंड’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. ‘झुंड’ हा नागराज मंजुळेंचा महत्त्वकांशी चित्रपट असून या चित्रपटात अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment