Video : चक्क पंख्याची हवा खाण्यासाठी या दुकानात दररोज येते गाय

कल्पना करा जर तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि तेथे तुम्हाला गाय अगदी निवांतपणे बसलेली दिसली तर तुम्ही काय करा ? एकतर तुम्ही दुकानदाराला त्या गायला बाहेर काढण्यासाठी तरी सांगाल अथवा तुम्ही त्या दुकानातच जाणार नाही. मात्र आंध्रप्रदेशमधील एका दुकानात येणाऱ्या लोकांसाठी ही साधी गोष्ट झाली आहे.

सोशल मीडियावर कपड्याच्या दुकानात बसलेल्या गाईचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये गाय ग्राहक आणि सेल्समन सोबत बसलेली दिसत आहे. आजुबाजूच्या लोकांना यामुळे काहीही त्रास होत नाही.

या कपड्याच्या दुकानाचे नाव साईराम शो रूम असून, हे दुकान आंध्रप्रदेशच्या कडपा जिल्ह्यातील मैदुकूर येथे आहे. येथे एक गाय दररोज 2-4 तासांसाठी येते आणि पंख्याच्या खाली निवांत आराम करत बसते. असे ही गाय मागील 6 महिन्यांपासून करत आहे.

दुकानाचे मालक पॉलिमेरा ओबय्या यांच्यानुसार, गाय दुकानात रोज बसते. मात्र ती फरशी देखील घाण करत नाही व कोणत्याच गोष्टीला नुकसान पोहचवत नाही. तिचे मन होते, तेव्हा ती उठून आरामशीरपणे निघून जाते.

या गाईमुळे आता दुकानाला गाय (COW) शॉप म्हणून ओळखू लागले आहेत. काही लोक तर तिची पुजा देखील करतात. दुकानदाराचे म्हणणे आहे की, गायने दुकानात येण्यास सुरूवात केल्यापासून त्यांची वृद्धी झाली आहे.

 

Leave a Comment