चक्क ‘अलेक्सा’च्या मदतीने पोलीस लावणार खुनाचा छडा

अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी पोलीस अमेझॉन इको आणि अ‍ॅमेझॉन इको डॉटच्या (व्हर्च्युअल असिस्टेंट) रेकॉर्डिंगची मदत घेणार आहेत. यासाठी पोलिसांनी सर्च वॉरंट देखील घेतले आहे. त्यांना वाटत आहे की, यामध्ये हत्येचे महत्त्वाचे पुरावे सापडतील.

फ्लोरिडामधील 32 वर्षीय सिल्विय गाल्वा क्रेस्पो छातीवर झालेल्या दुखापतीनंतर आपल्या घरात मृत अवस्थेत आढळल्या होत्या. त्यांचे पती 43 वर्षीय एडम क्रेस्पो या प्रकरणात एकमात्र आरोपी होते. पोलिसांनी त्यांच्यावर सेंकड डिग्री हत्येचा आरोप लावला.

पोलिसांनुसार, सिल्विया यांच्यावर झालेल्या हत्येचे पुरावे ऑडिओ रेकॉर्डिंग स्मार्ट स्पीकर्समध्ये रेकॉर्ड झाले आहेत. हे स्पीकर्स त्यांच्या बेडरूममध्ये होते. त्यामुळे या प्रकरणाचा शोध लावण्यासाठी हे स्पीकर्स महत्त्वाचे ठरणार आहेत.

असे असले तरी, पोलिसांचा हा अंदाज खोटा देखील ठरू शकतो. कारण अमेझॉन अलेक्सावर फक्त कमांड नंतरचेच बोलणे रेकॉर्ड केले जाते. अमेझॉनने सांगितले की, सरकारच्या या मागणीवर कंपनी ग्राहकांच्या माहितीचा खुलासा करत नाही.

अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायरमध्ये जानेवारी 2017 मध्ये देखील अमेझॉनला दोन महिलांच्या हत्येच्या प्रकरणात न्यायाधीशांनी इकोद्वारे रेकॉर्ड करण्यात आलेले संभाषण देण्याचे आदेश दिले होते. दोन्ही महिलांपैकी एकीच्या प्रियकरावर हत्येचा आरोप होता.

Leave a Comment