मुंबई मॅरेथॉनचा टायगर श्रॉफ ब्रँड अॅम्बेसिडर


यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचे बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ प्रमुख आकर्षण ठरणार आहे. कारण टायगरची मुंबई मॅरेथॉनचा अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. टायगरसोबत तसा करारदेखील मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांनी केला आहे. बॉलिवूडमध्ये टायगर श्रॉफचे नाव आजच्या जमान्यात यूथ आणि फिटनेस आयकॉन म्हणून अग्रक्रमाने घेण्यात येते. त्यामुळे मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांनी तरुणाईला आकर्षित करण्यासाठी मॅरेथॉनचा चेहरा म्हणून टायगरची निवड केली आहे.


19 जानेवारीला आयोजन यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचे करण्यात आले आहे. आशियातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये दरवर्षी 50 हजारांहून अधिक स्पर्धक भाग घेतात. स्पर्धेचे हे १७ वे वर्ष असणार आहे. टायगरच्या या निवडीबद्दल मॅरेथॉनच्या आयोजकांनी सांगितले की, मुंबई मॅरेथॉन गेल्या 17 वर्षांपासून या शहरासह देशातील लोकांना केवळ धावण्यासाठीच नव्हे तर फिटनेस आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. टायगर श्रॉफ मॅरेथॉनचा चेहरा बनल्यामुळे अधिकाधिक लोक, तरुण मॅरेथॉनशी जोडले जातील, अशी आशा आहे.

Leave a Comment