सोशल मीडियावर व्हायरल होत आहे राखी सावंतचा टॉपलेस व्हिडीओ


बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. तिचे जेव्हा पासून लग्न झाले आहे तेव्हा पासून तर ती सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या पती बद्दल काही ना काही बोलत असते. विशेष म्हणजे राखीने अद्याप पर्यंत तरी तिच्या पतीचा चेहरा दाखवलेला नाही. नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने एक-दोन नाही तर तब्बल पाच व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात ती टॉपलेस दिसत आहे.

हे व्हिडिओ राखी सावंतने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ती ज्यात टॉपलेस होऊन बॉलिवूड गाण्यांवर लिपसिंक करताना दिसत आहे. चादरीने तिने स्वतःला झाकले असून ती या व्हिडीओमध्ये ही गाणी तिच्या पतीसाठी गात आहे का असा प्रश्न तिचे चाहते विचारताना दिसत आहेत. पण राखीने यामध्ये कुठेही आपल्या पतीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही किंवा कॅप्शनमध्येही काहीही लिहिलेले नाही. पण तिचे चाहते मात्र तिच्या पतीला पाहण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे तिच्या व्हिडीओवर आलेल्या कमेंटमध्ये दिसत आहे.


राखीची अशाप्रकारे व्हिडीओ शेअर करण्याची पहिलीच वेळ नाही. तिने या आधीही अनेकदा अशाप्रकारे व्हिडीओ आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी राखी छप्पन छुरी या गाण्याच्या लॉन्चच्या वेळी तिच्या ट्रान्सपरंट ड्रेसमुळे चर्चेत आली होती. तिला या ड्रेसमुळे खूप ट्रोल करण्यात आल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्याचे स्पष्टीकरणही दिले होते.


राखीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर राखीने काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या जेडब्लू मॅरिएट हॉटेलमध्ये रितेश नावाच्या एका अनिवासी भारतीय मुलाशी लग्न केल्याचा खुलासा केला होता. पण यासोबतच तिने तिच्या नवऱ्याला मीडियासमोर येणे आवडत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळेच पतीसोबतचा कोणताही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. काही दिवसांपूर्वी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिच्या पतीने तो योग्यवेळी मीडियासमोर येईल असे सांगितले होते.