मिया खलिफाने इंस्टाग्रामवर पार केला 18 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा


पॉर्न इंडस्ट्रीतून माजी पॉर्न स्टार, लोकप्रिय मॉडेल मिया खलीफाने निवृत्ती घेतली असली तरी तिचे चाहते अजूनही तसूभर देखील कमी झालेले नाहीत. मिया आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे स्वतःचे हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन एन्टरटेन करत असते. म्हणूनच मियाच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या आता तब्बल 18 मिलियन (1 कोटी 80 लाख) एवढी झाली आहे. मियाने याबाबत इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. यावरूनच मिया खलिफाची पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतरही चाहत्यांमधील प्रचंड क्रेझ असलेली दिसून येत आहे.


मिया पॉर्न इंडस्ट्रीपासून दूर जाऊनही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते. बोल्ड फोटोज, व्हिडीओज, आपल्या विविध अवयवांचे दर्शनासह अनेक गोष्टी पाहायला मिळत असल्याने मियाला लोक फॉलो करतात. आपल्या या बोल्ड अंदाजामुळे मिया कैकवेळा लोकांच्या टीकेची शिकारही झाली आहे. पण अशा गोष्टींचा मियाला काहीही फरक पडत नाही हे तिच्या विविध पोस्टवरून दिसून येते.


दरम्यान, मिया खलिफाने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले होते की, पॉर्न चित्रपटात काम करणे ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. म्हणूनच संधी जेव्हा मिळाली तेव्हा तिने ती इंडस्ट्री सोडली. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये मिया खलीफाने फक्त 5 महिने काम केले आहे. आता आपल्या प्रियकराशी मियाने साखरपुडा केला असून, ते दोघे लवकरच लग्न करणार आहे.


नुकतेच एका कॅलेंडरसाठी मियाने बोल्ड फोटोशूट केले, मियाने हा फोटो याच कॅलेंडरच्या पूर्व-विक्रीसाठी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. मियाचे हस्ताक्षरदेखील या कॅलेंडरवर असणार आहे. त्यामुळे हे कॅलेंडर लवकरात लवकर विकी घ्यावे असे आवाहन मिया करत आहे. पण सध्या कॅलेंडरपेक्षा मियाच्या फोटोचीच चर्चा सर्वत्र चालू आहे. मिया या फोटोमध्ये एका बीचवर बोल्ड अवतारात बसलेली दिसत आहे. आपल्या अप्पर बॉडीचे दर्शनही ती या फोटोमध्ये घडवत आहे.

Leave a Comment