मला भारताच्या स्वाधीन केल्यास आत्महत्या करेन – नीरव मोदी


लंडन – लंडनच्या कोर्टात आत्महत्या करण्याची धमकी पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार असलेला आरोपी नीरव मोदीने दिली आहे. लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात 48 वर्षीय नीरवने बुधवारी म्हटले, की भारतात त्याचे प्रत्यर्पण करण्याचा निकाल आल्यास मी आत्महत्या करेन. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुरुंगात असताना आपल्यावर 3 वेळा जीवघेणा हल्ला झाल्याचे नीरवने सांगितले आहे. भारत सरकारची बाजू मांडणारे क्राउन प्रॉसेक्यूशन सर्व्हिसेज (सीपीएस) चेवकील जेम्स लेव्हिस म्हणाले, की नीरवच्या अशा स्वरुपाच्या विधानांमुळे तो फरार होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

बुधवारी पाचव्यांदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. न्यायाधीश एमा अबर्थनॉट म्हणाल्या, भविष्यातील संभावित घटनांचे यापूर्वी घडलेल्या घटना संकेत देत आहेत. साक्षीदारांवर दबाव टाकणार किंवा पुढच्या वर्षी मे महिन्यात होणाऱ्या सुनावणी दरम्यान नीरव मोदी हजर होणार हे सांगता येत नाही. डिप्रेशनमध्ये तो गेला असला तरीही त्याच्या जामीन अर्जावर नवीन आदेशात काहीच प्रभाव पडणार नाही.

जामीन अर्जात नीरव मोदीने मानसिक परिस्थितींचा खुलासा भारतीय मीडियामध्ये होणे अतिशय गंभीर आणि वाइट असल्याचे म्हटले आहे. मीडियामध्ये गुप्त मेडिकल रिपोर्ट लीक होणे अयोग्य असल्यामुळे, न्यायालयात भारत सरकारची विश्वासार्हता कमी होईल असेही नीरव मोदीने म्हटले आहे. तर नीरवच्या वकिलांनी मेडिकल रिपोर्ट लीक होण्यासाठी चक्क भारतीय तपास संस्थांनाच जबाबदार धरले आहे. परंतु, नीरवचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळून लावला. यापूर्वी 30 ऑक्टोबर रोजी नीरवने जामीन अर्ज केला होता.

Leave a Comment