या मंदिरात दर्शनासाठी असते परदेशी भक्तांची गर्दी

पर्वतांवर फिरायला तर तुम्ही अनेकदा जात असाल. मात्र तुम्ही कधी अशा पर्वतावरील मंदिराबद्दल ऐकले आहे का, जेथे केवळ देशातूनच नाही तर परदेशातून देखील नागरिक दर्शनासाठी येतात. उत्तराखंडमध्ये असलेल्या या मंदिराविषयी ऐकून फेसबुकचे फाउंडर मार्क झुकेरबर्ग आणि हॉलिवुड अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्स देखील दर्शनासाठी येऊन गेली आहे.

उत्तराखंडच्या नैनीताल येथील कैची धाम नावाचे हे मंदिर आहे. या मंदिराविषयी सांगितले जाते की, येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पुर्ण होते. या मंदिरात हनुमानाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे.

(Source)

या मंदिरात केवळ हनुमानच नाही तर देवी सीता आणि राम यांच्यासोबतच दुर्गा देवीची प्रतिमा स्थापन करण्यात आलेली आहे. या मंदिराची स्थापना करणाऱ्या नीम करोली बाबांना येथील लोक साक्षात हुनमानाचा अवतार देखील असल्याचे म्हणतात.

कैंची नावाच्या छोट्याशा खेड्यात असलेल्या या मंदिरात विदेशातून देखील भाविक दर्शनासाठी येतात. मार्क झुकेरबर्गपासून ते स्टिव्ह जॉब्सपर्यंत अनेकजण या मंदिरात येऊन गेले आहेत.

(source)

या मंदिरात जाण्यासाठी हल्द्वानी येथून जावे लागते. पुढील वेळी जर तुम्ही फिरण्यासाठी जाणार असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या.

 

Leave a Comment