Video : गुगल पिक्सल 4 XL बेंड टेस्टमध्ये नापास

एकीकडे गुगलचा पिक्सल 4 एक्सएल आपल्या शानदार फीचर्समुळे बाजारात लोकप्रिय ठरत आहे. मात्र युट्यूब चॅनेल JerryRigEverything ने आपल्या व्हिडीओमध्ये या स्मार्टफोनच्या डिझाईन आणि बेंडेंबल बॉडी टेस्ट केली आहे. या टेस्टमध्ये पिक्सल 4 एक्सएल नापास झाला आहे.

या 9 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये व्यक्ती फोनवर स्क्रॅच करत आहे आणि फोन बेंड करताना कितीवेळ टिकू शकतो हे पाहत आहे. गुगलने या स्मार्टफोनमध्ये मागे व पुढील दोन्ही बाजूंना प्रोटेक्शन ग्लास दिले आहे. त्यामुळे याच्यावर सहज कोणत्याच प्रकारचे स्क्रॅच पडत नाही. याशिवाय व्हिडीओमध्ये दिसले की, फोनवर थोडा दाब दिल्यावर तो लगेच बेंड होतो.

पिक्सल 4 एक्सएल आपल्या प्रिमियम डिस्प्ले आणि टॉप नॉच कॅमेऱ्यामुळे खूपच लोकप्रिय झाला होता.  मात्र व्हिडीओमध्ये दिसत आहे की, व्यक्ती सुरूवातीला गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन असलेल्या स्क्रीनवर स्क्रॅच करत आहे. अधिक ताकद लावल्यावर फोनवर लगेच स्क्रॅच येत आहेत. गुगलने पिक्सल 4 एक्सएलमध्ये एल्युमिनियम फ्रेम दिली आहे.

मेटल फ्रेम देण्यात आली असली तरी देखील बेंड टेस्ट दरम्यान फोनमध्ये क्रॅक येतात. असे असले तरी फोनचा डिस्प्ले मात्र चालत होता. अर्थात नियमित वापरण्यासाठी हा फोन चांगला आहे.

Leave a Comment