Video : चक्क धावत्या कारवर बसला हत्ती, पुढे बघा काय झाले

थायलंडच्या खाओ नॅशनल पार्कमध्ये अशी घटना घडली की, ते बघून सर्वच जण हैराण झाले. पार्कमध्ये एक हत्ती चक्क धावत्या कारवरच बसला. कारचा ड्रायव्हर एवढा घाबरला की, त्याने वेगाने गाडी पळवली, ज्यामुळे त्याचे प्राण वाचले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. थायलंडच्या नॅशनल पार्कमध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली.

35 वर्षीय ड्युक नावाचा हत्ती नॅशनल पार्कच्या रस्त्याने चालत होता. त्याच्या बाजूने कार जाताच तो त्याच्यावर बसला. हत्ती आपले पुर्ण वजन गाडीवर टाकणार, तेवढ्यात ड्रायव्हर गाडी पळवतो. पुढे व्हिडीओमध्ये दिसते की, हत्ती बसल्यामुळे कारची पाठीमागची व्हिंडशील्ड तुटली आहे व गाडी चेंबलेली आहे.

"ขึ้นเขาใหญ่ ไม่เคยได้เจอช้างเลยหวะ"🙏คำพูดที่ออกจากปากตอนคุยกับน้อง และแล้วก็ได้เจอสมใจนึก…

Posted by Aluminium Sakonnakhon on Tuesday, October 29, 2019

गाडीमध्ये किती प्रवाशी होते हे समजले नाही. मात्र गाडीतील फॉस्कॉर्न निल्ट्रॅक नावाच्या व्यक्तीने या घटनेचे फोटो फेसबुकवर शेअर केले.

या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी पर्यटकांना अशा परिस्थितीमध्ये काय करायचे ते सांगितले. हत्ती समोर आल्यास, बाहेर येऊन फोटो काढू नये, गाडीतच सुरक्षित राहावे.

Leave a Comment