घरच्या घरी बनवा अफगाणी बोलानी


आपला देश हा खाद्य संस्कृतीसाठी सुद्धा ओळखला जातो. नाना प्रकारचे पदार्थ आपल्या देशात बनवले जातात. त्यात काही लोक असे असतात त्यांना परदेशी खाद्यपदार्थ खुपच आवडतात. त्यात चायनीज, थाय, कॉन्टिनेन्टल, मेक्सिकन अशा अन्य काही देशातील पदार्थांचा समावेश असतो. त्यात अफगाणी खाद्य पदार्थांचा एक वेगळाच अंदाज असतो. माझा पेपर आज तुम्हाला त्यातलाच एका सध्या सोप्या पदार्थाची पाककृती दाखवणार आहे. तो खाद्यपदार्थ आहे अफगाणी बोलानी. नाव ऐकूण तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. पण गोंधळून जाऊ नका आणि एका मिनिटात पहा अफगाणी बोलानी कशी बनवायची

अफगाणी बोलणी रेसिपी
2 कप मैदा
3/4 कप पाणी
1/4 कप तेल
चिमूटभर मीठ

बटाट्याचे सारण साठी
1 कप बटाटा कुस्करून
1/4 टिस्पून हिरव्या मिरच्या चिरून
एक मूठभर धणे कोथिंबीर
मीठ आणि मिरपूड चवीनुसार

पद्धत:
मैदा, तेल, मीठ आणि पाणी एका मिश्रण भांड्यात घालून मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यावा.
उकडलेले बटाटे, चिरलेला कोथिंबीर, मिरची, मिरची आणि मीठ यांचे मिश्रण करून घ्यावे.
भिजवलेल्या काणिकेच्या गोळयाच्या चापत्या लाटून घ्या आणि त्यात बटाट्याचे सारण भरून तो करंजी प्रमाणे दुमडून घ्याल.
तेला मधे पराठा खरपूस भाजून घ्या आणि गरमा गरम सर्व्ह करा.

Leave a Comment