‘पती पत्नी और वो’चा ट्रेलर रिलीज


अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या आगामी ‘पती पत्नी और वो’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. चित्रपटात कार्तिक चिंटू त्यागी नामक एका व्यक्तीची भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटात वडिलांच्या सांगण्यावरून दहावी ते नोकरी त्यानंतर लग्न असा प्रवास करणाऱ्या कार्तिकच्या नशिबात आराम नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

भूमी चित्रपटात त्याच्या पत्नीची तर अनन्या त्याच्या प्रियेसीच्या भूमिकेत दिसणार आहे. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. याच पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा साकारण्याची जबाबदारी घेतली. ‘पती पत्नी और वो’ चित्रपट ६ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment