शेकडो वर्षांनंतर प्रथमच हलली नायगारा धबधब्यात अडकलेली नाव

नायगारा धबधब्याच्या खडकांमध्ये 101 वर्ष अडकलेली मोठी नाव वेगवान वारे आणि जोरदार पावसात वाहून गेली. ही नाव अमेरिकेतून कॅनेडाच्या बाजूला गेली आहे. 1918 पासून ही नाव धबधब्याच्या तोंडावर अडकली होती.

रिपोर्टनुसार, या नावेवर दोन प्रवाशी सेंट लॉरेंस नदीतून जात होते. त्याचवेळी हवामान बदलल्याने आणि पाण्याच्या वेगामुळे नाव धबधब्याच्या किनाऱ्यावर येऊन अडकली. यावर असलेल्या दोन्ही प्रवाशांना वाचवण्यात आले होते.

लाकूड आणि लोखंडापासून बनलेली ही नाव खडकांमध्ये अडकल्याने ती खराब झाली होती. त्यामुळे लोक या नावेला देखील एक खडकच समजत असे.

नायगारा धबधबा हा अमेरिका आणि कॅनेडाच्या सीमेवर आहे. सेंट लॉरेंस नदीवर असलेला नायगारा धबधबा कॅनेडाच्या ओंटारियो आणि अमेरिकेच्या न्युयॉर्क या आंतरराष्ट्रीय सीमेवर आहे. नायगारा जगातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे.

Leave a Comment