संजय दत्त पाठोपाठ समोर आला अर्जुन आणि क्रितीचा पनिपतमधील लूक


आता पानिपतच्या लढाईवर आधारित चित्रपट घेऊन ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘पानिपत’ हा चित्रपट येत्या 6 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटातील कलाकारांचे लूक आता समोर येऊ आले आहेत. अभिनेता संजय दत्त हा चित्रपटात अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत आहे. तर सदाशिवराव भाऊ अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन पार्वती बाईच्या भूमिकेत झळकणार आहे. आशुतोष गोवारीकर यांनी या तिघांच्याही लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अर्जुन, संजय आणि क्रिती यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्यांदाच या चित्रपटातील हे लूक समोर आले आहेत. उद्या म्हणजेच मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलरही आऊट होणार आहे.


मराठे जरी पानिपतची लढाई ही हरले असले तरीही ती मराठ्यांची शौर्यगाथा होती. ही लढाई अहमद शाह अब्दाली याने जिंकली खरी पण चर्चा घडली ती मराठ्यांच्या साहसाची आणि पराक्रमाचीही. या युद्धात सदाशिवराव भाऊ कामी आला. हा सगळा इतिहास आशुतोष गोवारीकर मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत.


या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सेनान यांच्यासह अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचीही महत्त्वाची भूमिका आहे. पण अद्याप तिचा लूक रिव्हिल करण्यात आलेला नाही. नानासाहेब पेशवा यांच्या पत्नी असलेल्या गोपिका बाई यांची भूमिका पद्मिनी कोल्हापूरे साकारणार आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलने या चित्रपटाला संगीत दिले आहे.


यात पानिपतची काही स्थळे व गावे दिसतील. मराठ्यांचे सैन्य पानिपतजवळील भादड गावात येऊन थांबले होते. इसरानाजवळील एका मोकळ्या जागेत सदाशिवराव भाऊ यांचा तंबू टाकण्यात आला होता. येथेच भाऊपूर नावाचे गाव नंतर वसवले गेले. युद्धाची प्रमुख भूमी भादड गाव होते. विश्वासराव मारले गेल्यानंतर सदाशिवराव भाऊ हत्तीवरून खाली उतरतात. तेव्हा सैन्याला वाटते, तेही मारले गेले. सैन्याचे मनोधैर्य यामुळे खचते आणि सैन्य सैरावैरा धावत सुटते. यामुळे येथे भादड गाव वसले. मराठ्यांनी येथे प्रगटेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली होती. हे मंदिर आजही तेथेच आहे. येथे एक झाड लावण्यात आले होते. याच मंदिराच्या धर्तीवर त्यांनी देवीचे मंदिर बांधले. मराठ्यांचे ऐतिहासिक स्थळ उग्राखेडी गावात काला अम्ब मंदिर आहे. सदाशिवराव भाऊ यांना भाऊसाहेबही म्हटले जात होते. अर्जुन कपूर चित्रपटात त्यांची भूमिका साकारणार आहे. अहमदशाह अब्दाली दुर्राणी नावानेही ओळखला जातो. संजय दत्त त्याच्या भूमिकेत आहे. अब्दाली कवी होता. यामुळे संजय दत्त कविता सादर करताना दिसेल. त्याचबरोबर या चित्रपटात सदाशिवराव भाऊ यांचे खासगी आयुष्य दिसेल.

Leave a Comment