एनआरसीवरून रंजन गोगोईंनी मीडियाला फटकारले

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी आसाम नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) वरून माध्यमांना चांगलेच फटकारले आहे. ‘पोस्ट कॉलोनियल आसाम’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात गोगोई यांनी माध्यमांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले की, एनआरसी लागू केल्याच्या दरम्यान बिघडलेल्या परिस्थितीला माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने केलेले रिपोर्टिंग जबाबदार आहे.

ते म्हणाले की, एनआरसी गोष्टींना योग्य दृष्टीने बघण्याची संधी आहे. हे केवळ एक कागदपत्रे नाहीत. किंवा 19 लाख अथवा 40 लाख लोकांची गोष्ट नाही. ही भविष्यातील आधाराची कागदपत्रे आहेत. गोगोई म्हणाले की, काही माध्यमांच्या चुकीच्या रिपोर्टिंगमुळे परिस्थिती आणखी बिघडली.

दरम्यान, रंजन गोगोई हे सरन्यायाधीश पदावरून 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.

Leave a Comment