कसे बनवाल चिकन मलई कबाब


चिकन म्हटले की आपल्यापैकी कित्येकजणांचा जीव की प्राण…. आपल्याकडे वार म्हटला की चिकनचा हमखास बेत होतोच. एक तर आपण चिकन घरीच बनवतो किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपली खाद्य हौस भागवतो. चिकनमध्ये कबाब हा देखील पदार्थ येतो. कबाब म्हटले की आपल्या तोंडाला पाणी सुटतेच. कबाब समोर ठेवले तर तो काही सेकंदातच फस्त केले जाते. तर माझा पेपर आज असेच चवदार चिकन मलई कबाब बनवायची सोपी पद्धत तुम्हाला एका मिनिटात दाखवणार आहे. चला तर मग चिकन मलई कबाब बनवू आणि आपला वार आणखी लज्जतदार बनवू.

चिकन मलाई कबाबसाठी लागणारे साहित्य
500 ग्रॅम बोनस चिकन
2-1/2 मोठे चमचे आले लसूण पेस्ट
2 मोठे चमचे – मिरचीचे विनिगर
1/2 कप – दही
2 मोठे चमचे – क्रिम
4 मोठे चमचे – चेडर चीज
1 – अंडे
1 टेस्पून – कॉर्न फ्लोअर
2 छोटे चमचे – हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
मीठ चवीनुसार

पद्धत – एका वाडग्यात चिकनचे तुकडे घ्या आणि त्यात आले-लसूण पेस्ट, मिरचीचा व्हिनेगर आणि मीठ घालून नीट मिक्स करा. मिश्रण तासभर बाजूला ठेवा. आता त्यात दही, मलई, चेंडर चीज, कॉर्नफ्लॉवर, चिरलेला मिरची आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे. कमीतकमी 3 ते 4 तास मिश्रण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. तव्यावर थोडे तेल घ्या आणि त्यात चिकनचे तुकडे स्केवरला लावून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्याल. आपले चिकन मलाई कबाब गरम सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

Leave a Comment