अनाथ मुलांसाठी जेवण बनविणारे प्रसिध्द युट्यूबर ‘ग्रँडपा’ यांचे निधन

गरीब आणि उपाशी मुलांसाठी जेवण बनविणारे प्रसिध्द युट्यूबर नारायण रेड्डी यांचे निधन झाले आहे. ते 73 वर्षांचे होते. त्यांना ‘ग्रँडपा किचन’ या नावाने ओळखले जात असे. ते तेलंगाणाचे होते. लोकांमध्ये ते आपल्या खऱ्या नावापेक्षा युट्यूब चॅनेलचे नाव ‘ग्रँडपा किचन’ या नावाने प्रसिध्द होते.

26 ऑगस्ट 2017 ला नारायण रेड्डी यांनी ग्रँडपा किचन नावाने एक युट्यूब चॅनेल सुरू केला होता. या चॅनेलला 6 मिलियन पेक्षा अधिक स्बस्क्राबर्स आहेत. त्यांच्या डिशेजचे जगभरात चाहते होते. त्यांच्या रेसिपी लोकांना आवडत असे.

युट्यूबवर त्यांचे व्हिडीओ चांगलेच लोकप्रिय ठरतायचे. आपल्या व्हिडीओमध्ये ते 100 पेक्षा अधिक लोकांसाठी जेवण बनवत असे. हे जेवण बनविल्यानंतर ते हे अन्न गरीब आणि अनाथ मुलांना देत असे.

Leave a Comment