
९० च्या दशकात अभिनेता मिलिंद सोमण हा खूपच प्रसिद्धीच्या झोतात होता. अनेक तरुणी त्याच्या फिटनेस आणि लूकवर फिदा होत्या. मिलिंदने मागीच्या वर्षी गर्लफ्रेंड अंकिता कोंवरसोबत लग्न केले. मिलिंदपेक्षा तब्बल २६ वर्षांनी अंकिता ही लहान आहे. या कपलला यावरुन ट्रोल देखील केले गेले होते. पण या दोघांना देखील त्याचा काहीही फरक पडत नाही. इंस्टाग्रामवर नेहमीच आपले बिकिनीमधील फोटो देखील अंकिता शेअर करत असते.
इंस्टाग्रामवर पुन्हा लावली मिलिंद सोमणच्या पत्नीने आग
अंकिता देखील मिलिंदप्रमाणेच फिटनेसकडे लक्ष देते. मॅरेथॉनमध्ये दोघेही भाग घेत असल्यामुळेच ती फिट दिसते. तिचा फिटनेस तिच्या बिकिनी लूकमध्ये देखील पाहायला मिळतो.
इंस्टाग्रामवरील एका फोटोमध्ये अंकिता पूलजवळ झोपून फोटोसाठी हॉट पोझ देत आहे. अंकिता इंस्टाग्रामवर देखील खूपच पॉप्युलर आहे. तिचे ११० लाख फॉलोवर्स आहेत.
फिटनेससोबत मिलिंद आणि अंकिताला फिरणे देखील खूपच आवडते. सोशल मीडियावर दोघेही आपल्या भटकंतीचे फोटो शेअर करत असतात.
एक फोटोमध्ये अंकिता पाण्यात बीचवर लाटांमध्ये मजा करताना दिसते आहे. या दरम्यान ती एका मल्टीकलरच्या स्ट्राइप्ड बिकिनीमध्ये हॉट दिसत आहे.
गुवाहटीमध्ये अंकिताचा जन्म हा झाला आहे. सुरुवातीला ती एका एअरलाइन्समध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होती. या फोटोमध्ये अंकिता एका ग्रे ब्लॅक आणि व्हाईट हाय वेस्ट बिकिनीमध्ये दिसत आहे.
