माझ्या कालच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, फारुख इंजिनिअर यांचा यु-टर्न


कालच निवड समिती आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मावर टीका करणाऱ्या माजी यष्टीरक्षक फारूख इंजिनिअर यांनी आता आपल्या वक्तव्यावरुन यु-टर्न घेतला आहे. यात उगाचच बिचाऱ्या अनुष्काचे नाव गोवले, ती खूप चांगली मुलगी आहे. पण माझ्या कालच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे. निवड समितीमधील काही लोकांकडे माझा बोलण्याचा रोख होता, अनुष्काकडे नसल्याचे म्हणत ते एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

माजी यष्टीरक्षक फारूख इंजिनीअर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीवर निशाणा साधताना विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचा उल्लेख केला होता. विश्वचषकातील काही सामन्यादरम्यान निवड समितीमधील लोक अनुष्काला चहा आणून देताना मी पाहिले आहे, असे फारुख यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

पण नंतर फारूख यांनी रिपब्लिक टीव्ही या खासगी वाहिनीशी बोलताना अनुष्काची माफी मागितली आहे. मी अनुष्कावर टीका केली नव्हती. तिला उगाच यात गोवले गेले. ती आणि विराट कोहली हे दोघेही खूप चांगले व्यक्ती आहेत. तिच्याविषयी माझ्या मनात कोणतीही अडी नाही. तिला जर माझ्या विधानामुळे वाईट वाटले असेल तर मी तिची मनापासून माफी मागतो. केवळ निवड समितीमधील लोकांवर मी टीका केली, जे आपले कर्तव्य नीट बजावत नव्हते. याचा अनुष्का-विराटशी काही संबध नव्हता, असे फारुख म्हणाले.

Leave a Comment