व्हायरल होत आहे ‘गिरधारीपूर की शादी’


मुंबई : लग्न म्हटले गंमती-जमती असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. वधु-वर एकमेकांना हार घालतात तो लग्नातील एक महत्त्वाचा विधी असतो. या दोन ‘उत्सवमूर्तीं’कडेच सर्व उपस्थितांचे लक्ष लागलेले असते पण याच दरम्यान वधु-वरात ‘फाईट’ लागली तर कसे वाटेल? पण सध्या असाच एक व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये वधु आणि वर एकमेकांना हार घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या दोघांमध्ये हार घालण्यासाठी लागलेली ही चढाओढ तुमच्याही ओठांवर नकळत हसू खुलवेल.

Leave a Comment