भारतीय राष्ट्रगीतावेळी बसून राहिल्या जर्मन चान्सलर अँजेला मार्केल


नवी दिल्ली – जर्मन चान्सलर अँजेला मार्केल सध्या भारताच्या दौऱ्यावर असून आज त्यांचे राष्ट्रपती भवनात पारंपरिक रुपात स्वागत करण्यात आले. त्या दरम्यान मार्केल यांनी राष्ट्रगीत सुरु असताना उपस्थिती लावली. पण मार्केल राष्ट्रगीतावेळी उभ्या राहण्याऐवजी बसूनच राहिल्या होत्या. यामागे मार्केल यांची तब्येत ठिक नसल्याचे कारण सांगत त्या बसून राहिलल्याचे सांगण्यात येत आहे. एका मर्यादित वेळानंतर त्यांना उभे राहिल्यानंतर त्रास होत असल्यामुळेच भारताच्या सरकारला जर्मनीकडून राष्ट्रगीतावेळी बसण्याची परवानगी द्यावी असे सांगण्यात आले होते. त्यानंतर हा प्रस्ताव सरकारकडून मान्य करण्यात आला.


राष्ट्रपती भवनात पोहचल्यानंतर मार्केल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले. मार्केल यांनी त्यावेळी अधिकारी आणि विदेश मंत्री एस जयशंकर यांची सुद्धा भेट घेतली. मी भारतात येऊन खुप खुश असून भारत-जर्मनीच्या मधील नातेसंबंध उत्तम आहेत. जर्मनीला वैविध्यपूर्ण अशा भारत देशाची आदर आहे. मार्केल यांनी राजघाटात जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली सुद्धा वाहिली. गुरुवारी रात्री उशीरा मार्केल भारतात पोहचल्या. त्यावेळी राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर हैदराबाद हाउस मध्ये मार्केल आणि मोदी यांनी एकमेकांची भेट झाली. या दोन्ही देशाच्या नेत्यांच्या दरम्यान काही महत्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाली.

Leave a Comment