शीर्षासनासह प्या बियर – पाश्चात्य देशांतील नवे फॅड


निरनिराळ्या योगासनांसह बियर पिण्याचे एक नवे फॅड पाश्चात्य देशांमध्ये आले आहे. ‘बियर योगा’ असे नाव या प्रकाराला देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तंदुरुस्तीचे हे नवे सर्वात मोठे फॅड मानण्यात येत आहे.

जर्मनीतील एका स्टुडियोत या कल्पनेचा जन्म झाला. बियर पिण्याच्या वेळेस योगासने करण्यामुळे कंटाळलेल्या लोकांनी हा प्रकार शोधून काढला. ही कल्पना सर्वात आधी काढणाऱ्या झुला आणि एमिली या दोघी या योगासनांचे वर्ग घेत आहेत.

‘बियर आणि योगासने या दोन सर्वाधिक आवडत्या गोष्टींचे बियरयोगा हे मिलन आहे. मन, शरीर आणि आत्मा यासाठी या दोन्ही शतकानुशतके जुन्या उपचार पद्धती आहेत,’ असे त्यांच्या संकेतस्थळावर लिहिले आहे.

“बियरयोगा मजेदार आहे परंतु हा काही विनोद नाही. योगाच्या तत्त्वज्ञानाला आम्ही बियरप्राशनाची जोड दिली आहे. जेणेकरून तुमच्या जाणीवेची सर्वोच्च पातळी गाठता येईल,” असे झुला हिने लिहिले आहे.

जर्मनीनंतर ऑस्ट्रेलियातील तंदुरुस्तीप्रिय नागरिकांना बियरयोगाने पछाडले आहे. सिडनीत आता बियरयोगाचे शिकवणी वर्ग निघाले आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment