रेल्वे बोगीमधील या खिडक्या का असतात वेगळ्या? कारण ऐकून बसेल तुम्हाला धक्का


भारतीय रेल्वे हे आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे आणि एकाच सरकारच्या मालकीचे जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात आणि या कोट्यवधी लोकांना आपल्या स्थानापर्यंत नेण्यासाठी, रेल्वे दररोज सुमारे 13000 गाड्या चालवते. तुम्हीही ट्रेनमध्ये प्रवास केला असेलच पण बोगीमधील दाराजवळील खिडकी वेगळी का असते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? तर आज आम्ही त्याच खिडक्यांबाबत सांगणार आहोत. चल तर माग जाणून घेऊयात काय आहे कारण

ट्रेनच्या स्लीपर आणि सामान्य बोगीच्या खिडक्यांत लोखंडी सळी असते. पण दाराजवळ असलेल्या खिडकीत नेहमीपेक्षा जास्त लोखंडी सळ्या असतात. ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांनी ही गोष्ट नक्कीच पाहिली असेल. पण यामागचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

वास्तविक, दाराजवळील खिडकीत चोरीची भीती सर्वाधिक असते. चोर अनेकदा या खिडक्यांमध्ये हात घालून सामान चोरून शकत होते. कारण या खिडक्यांपर्यंत फूटबोर्डवरून देखील पोहचू शकत होते.

रात्री सर्व प्रवासी झोपलेले असताना चोर सहज खिडकीतून सामान चोरु शकत होते. या समस्येवर मात करण्यासाठी या खिडक्यांमध्ये नेहमीपेक्षा अधिक लोखंडी सळ्या लावण्यात आल्या आहेत. अधिक लोखंडी सळ्या असल्याने, अंतर इतके कमी झाले आहे की कोणीही खिडक्यांमधून प्रवेश करू शकत नाही.

त्याचबरोबर रात्रीच्या वेळी ट्रेन थांबलेली असताना चोरांना खिडकीतून दरवाजा उघडता येणार नाही, यासाठी दरवाजाच्या खिडक्यातही जास्त लोखंडी सळ्या बसविल्या आहेत.

Leave a Comment