वायुसेनेने शेअर केला 90 वर्षीय माजी एअर मार्शलांचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ


नवी दिल्ली – भारतीय वायुसेनेने बुधवारी माजी एअर मार्शल पीव्ही अय्यर यांच्या 90 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते जिममध्ये पुल-अप्स करताना दिसत आहेत. हवाई दलाने एका ट्विटमध्ये लिहिले आहे, एअर मार्शल अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी यामुळे एक गोष्ट स्पष्ट केली आहे, जी म्हणजे वयाचा आकडा हा केवळ खेळ आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


मुलगा परम अय्यर यांनी वडील पीव्ही अय्यर यांच्यासाठी ट्विटरवर एक लेख शेअर केला आहे. यात त्याच्या वडिलांचे नाव रनिंग मार्शल असे ठेवले आहे. परमने यापूर्वीच आपल्या वडिलांचे व्यायाम करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

Leave a Comment