
मुंबई – भाजपकडून जोपर्यंत लिखित स्वरूपात कोणताही प्रस्ताव येत नाही तोपर्यंत आमच्याकडून शिवसेनेची भूमिका स्पष्ट होणार नाही. आप आपला नेता प्रत्येक जण निवडत आहे. भाजप देवेंद्र फडणवीस तर राष्ट्रवादीने अजित पवार यांना निवडले. जे स्थिर सरकार होण्यासाठी ठरले आहे ते तसेच व्हायला हवे त्यात मुख्यमंत्री पदही हवे. आज शिवसेनेची बैठक होणार आहे, त्यात मग आम्ही नेता आमचा ठरवू. भाजपचा कोणता फॉर्म्युला आहे, आम्ही काही नोंद वही घेऊन बसलो नाही, असे शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्राची कुंडली शिवसेना ठरवणार – संजय राऊत
महाराष्ट्राचे हित राहण्यात आम्ही सोबत आहे. शिवसेना महाराष्ट्राची कुंडली ठरवणार, कुठे कोणते ग्रह ठेवायचे हे आमच्या हातात आहे. जर मुख्यमंत्री असे म्हणत असतील की, शिवसेनेचे 23 आमदार संपर्कात आहेत. तर तुम्ही फक्त आकडे बांधा असा टोला देखील त्यांनी लगावला. जे जे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देतील ते आम्ही सर्व करू असे देखील ते म्हणाले. शिवसेनेचा कुठलाही आमदार फुटणार नाही. सगळे ठरल्याप्रमाणे होऊ द्या, असे मला म्हणायचे आहे.
