जगातील सर्वात मोठ्या बँकेत कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी द्यावे लागणार पैसे

इंडोनेशियातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने कॉस्ट कंटिगमुळे कर्मचाऱ्यांसाठी पाणी पिण्याची मर्यादा निश्चित केली आहे. पीटी बँक सेंट्रल आशिया (बीसीए) मध्ये निश्चित करण्यात आलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाण्यासाठी कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतील. हा निर्णय बँकेचे वॉइस प्रेसिडेंट डायरेक्टर अर्मांड वाह्युदी हारतोनो यांनी घेतला आहे. अर्मांड यांनी सांगितले की, कर्मचारी मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवतात. ते नेहमीच अर्धा ग्लास पाणी पिल्यावर अर्धे फेकून देतात. यासाठी आम्ही पाण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

गुंतवणूकीच्या हिशोबाने बीसीए केवळ इंडोनेशियातीलच नाही तर जगातील सर्वात मोठी बँक आहे. याचे वॅल्यूएशन 5 हजार कोटी डॉलर पेक्षा अधिक आहे. केवळ 2008 मध्ये या बँकेचे शेअर्स घसरले होते. त्यानंतर प्रत्येक वर्षी बँकेचे शेअर्स वधारले आहेत.

बँकेच्या यशासाठी कॉस्ट कंट्रोलसाठी करण्यात आलेल्या उपायांना देखील श्रेय दिले जाते. जगातील मोठ्या बँकेमध्ये बीसीएच्या स्टॉकची किंमत सर्वाधिक आहे. इंडोनेशिया दक्षिण-पुर्व आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तेथील सरकारने ई-पेमेंटच्या वाढीसाठी देखील पावले उचलली आहेत.

पाण्याची मर्यादा घालण्याआधी बँकेने कर्मचाऱ्यांसाठी इंटरनेट कोटा देखील निश्चित केला होता. याशिवाय जे डिपार्टमेंट मीटिंग रूमचा वापर करते. त्या डिपार्टमेंटला त्यासाठी भाडे देखील द्यावे लागते.

 

Leave a Comment