तुमच्या ‘या’ गोष्टींवर गुगलचे असते लक्ष


कोणत्याही कंपनीचा स्मार्टफोन किंवा कोणतेही गुगलचे डिव्हाईस जर तुम्ही वापर असल्यास गुगलची त्यावर कायम करडी नजर असते. प्रत्येक युजर्सच्या हालचालींना गुगल ट्रॅक करत असते. तसेच त्यांच्या काही महत्वाच्या सर्विसेस बदलण्यासह युजर्सच्या पर्सनल गोष्टींबाबत सुद्धा गुगल माहिती ठेवते. तुम्ही कधी आणि कोणत्या वेबसाईटवर काय सर्च केले आहे याचा संपूर्ण डेटा गुगलकडे असतो. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काय खरेदी केले याची सुद्धा माहिती गुगलकडे असते. गुगल हे सध्या प्रत्येकासाठी सर्च इंजिन झाले असून जगभरात त्याचा वापर केला जातो.

तुम्ही जे काही इंटरनेट आणि वेबवर सर्च करता त्याची एक नोट गुगलकडे तयार होते. हे असे ज्यावेळी होते जेव्हा तुम्ही गुगल क्रोममध्ये Sign In केलेले असते. संपूर्ण माहिती त्यामध्ये असून तुमच्या गुगल हिस्ट्री बाबत अधिक माहिती येथून मिळते. युजर्सच्या फोनमधून लोकेशन हिस्ट्री सुद्धा गुगल अॅक्सेस करु शकते. कारण गुगलला माहिती असते की तुम्ही कधी आणि कोणत्या तारखेला कुठे होतात. त्याचसोबत वॉइस आणि ऑडिओ अॅक्टिव्हिटी बाबत बोलायचे झाल्यास त्यावर सुद्धा गुगलची नजर असते. तुम्ही जी काही कमांड गुगल असिस्टंवर देतात गुगल ते आपल्याकडे स्टोर करुन ठेवते. तसेच गुगल असिस्टंवरील सुद्धा सर्व गोष्टी गुगल ट्रॅक करते. युट्युब बाबत ही हिच गोष्ट गुगलकडून केली जाते.

ऑनलाईन शॉपिंग जर तुम्ही केली असल्यास गुगलकडे त्याची माहिती सुद्धा असते. गुगलकडे तुमच्याकडून खरेदी केलेले एखादे तिकिट, बिल्स यांच्यासह अन्य महत्वाची गोपनिय माहिती असते. पण याचे फायदे सुद्ध आहेत. कारण तुमचे विमान जर उशिराने उड्डाण करणार असेल तर त्याची माहिती गुगलकडून दिली जाते. परंतु सध्या डेटा लीक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

Leave a Comment