‘हा’ हेअरड्रेसर चक्क कुर्‍हाडीने करतो हजामत


मॉस्को: सर्वसाधारणपणे कात्रीचा आणि वस्त-याचा वापर सलूनमध्ये केस कापण्यासाठी केला जातो. मात्र एक सलून रशियामध्ये असे आहे जिथे हेअरड्रेसर कात्री आणि वस्त-याला हातच लावत नाही. तर तो तिथे चक्क ग्राहकांचे केस कु-हाडीने केस कापून देतो. डॅनिल इस्टोमीन असे या अनोख्या सलूनचे नाव आहे .

सध्या जगभरात या सलूनमध्ये कु-हाडीने केस कापणारा डॅनिल चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या अनोख्या कलेचा व्हिडीओ त्याने यू ट्यूब अपलोड करताच त्याला एकच प्रसिद्धी मिळाली. सध्या त्याचा तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या केस कापण्याच्या अनोख्या शैलीचा व्हिडीओ सध्या चांगलाच पसंत केला जात आहे.

केस कापण्यासाठी कात्रीऐवजी कुर्‍हाडीचा वापर जास्त सोपा व सोयीस्कर असल्याचा दावा डॅनिलने केला आहे. तो व्हिडीओमध्ये कुर्‍हाडीने आपल्या ग्राहकांचे केस कापताना दिसतो व तेही कोणतीही भिती न बाळगता त्याच्याकडून केस कापून घेत आहेत. कधी ग्राहकाच्या मानेजवळ तर कधी कपाळावर केस कापताना कुर्‍हाड जाते. मात्र डॅनिल एवढेच सफाईदारपणे केस कापतो की गिर्‍हाइकला कुर्‍हाडीच्या धारेचा हलकासाही स्पर्श होत नाही.

यू ट्यूबवर अवघ्या पाच दिवसांपूर्वी अपलोड झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना काहींनी डॅनिलचे कौतुक केले आहे तर काहींनी एवढी जोखीम असूनही लोक डॅनिलला केस कापण्याचे पैसे देत आहेत, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

Leave a Comment