Video : बाबो ! या एका रोटीत भरेल तुमच्या संपुर्ण कुटूंबाचे पोट

सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा रोटी (चपाती) बनवितानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून सर्वच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. कारण व्हिडीओमधील व्यक्ती जी रोटी बनवत आहे, ती तुमच्या ताटात बसूच शकत नाही. ही रोटी तुमच्या बेडवर फीट बसू शकते. तसं बघितल तर ही ‘रूमाली रोटी’ आहे. मात्र त्याच्या आकारावर लोक याला ‘चादर रोटी’ म्हणत आहे.

आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आपण सगळ्यांनी रूमाली रोटीबद्दल ऐकले आहे, मात्र कधी चादर रोटीबद्दल ऐकले आहे का ही रोटी संपुर्ण कुटुंबाचे पोट भरू शकते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, आतापर्यंत 38 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी हा व्हिडीओ बघितला आहे. तर शेकडो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment