Video : झुरळांना मारण्यासाठी त्याने केला धमाका

घरात झुरळ होणे ही सामान्य बाब आहे. त्या झुरळांना मारण्यासाठी आपण औषधांचा वापर करतो. मात्र ब्राझीलमधील एका व्यक्तीने जे केले ते हैराण करणारे आहे. या व्यक्तीने घरातील झुरळांना मारण्यासाठी चक्क धमाकाच केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्राझीलमधील 48 वर्षीय सीझर शमित्झने झुरळांना मारण्यासाठी असा प्लॅन केला की, तो त्याच्यावरच उलटला.

सीझरने सांगितले की,माझ्या पत्नीने तक्रार केली की, गार्डनमध्ये खूप झुरळ झाली आहेत. तिला त्याची खूप भिती वाटते, त्यामुळे तिने त्यांना संपुर्णपणे नष्ट करण्यास सांगितले.

झुरळांचे घर नष्ट करण्यासाठी सीझरने त्यात गॅसोलीन ओतले आणि त्याला आग लावली. मात्र झुरळांना मारण्यासाठी लावलेल्या आगीने एवढा मोठा धमाका झाला की, गार्डनमधील टेबल देखील हवेत उडाला आणि घराच्या काचा देखील फुटल्या.

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 2.6 मिलियन व्यूज आले असून शेकडो युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment