दुसऱ्याच्या घराचा फोटो शेअर करुन ट्रोल झाली ड्रामा क्वीन


कायम चर्चेत राहण्यासाठी बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत काहीना काही उचापत्या करतच असते. गेले अनेक दिवस ती लग्नामुळे चर्चेत आहे. पण तिच्या नवऱ्याचा फोटो किंवा व्हिडीओसुद्धा आतापर्यंत बाहेर आलेला नाही. असे असताना शुक्रवारी आपल्या इंस्टाग्रामवर राखीने आपल्या नवऱ्याच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देत राखीला टोले लगावलेत. हा टीक-टॉक व्हिडीओ आहे, फेकण्याचीही काही लिमिट असते उगाच काहीही फेकू नकोस असे म्हणत लोकांनी तिला चांगलेच सुनावले. सोशल मीडियावर राखी सावंतचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिच्या व्हिडीओत एक अलिशान घर दिसत आहे. त्यात जोड्यांची एक मोठी रॅक असून मोठा अलिशान बेडही दिसत आहे. त्या रुमला काचेची मोठी वॉल असून त्यातून बाहेरचे दृष्यही दिसत आहे. बेडच्या बाजूलाच व्यायाम करण्याच्या काही वस्तूही ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.


आपल्या पोस्टखाली राखीने लिहिले आहे, हे माझे घर, मी माझ्या नवऱ्याच्या ह्रदयातील आणि घरातील राणी आहे. नेटकऱ्यांनी राखीच्या या पोस्टवर भन्नाट कमेंट्स करून तिची फिरकी घेतली. तर तिला काहींनी सुनावण्यासही कमी केले नाही. हे तुझे घर नाही तर हॉटेलची रुम असल्याचेही लोकांनी तिला सुनावले आहे.

याबाबत स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार राखी सावंतचा पती रितेशने सांगितले की, जाणीवपूर्वक तो कॅमेऱ्यासमोर येत नाही. मला माझे खासगीपण जपायचे असल्याचेही त्याने सांगितले. त्याने राखी गरोदर असल्याच्या वृत्ताचाही इन्कार केला.

Leave a Comment