व्हायरलः धोनीची मुलीसह गाडीची धुलाई


टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बाईक व कारचा शौकिन म्हणून ओळखला जातो. धोनीकडे सध्या अनेक लक्झरी कार आणि सुपरबाईक्स आहेत. यासाठी त्याने घरात एक गॅरेज बांधले आहे.


अलीकडेच त्यांच्या गॅरेजमध्ये नवीन वाहन आले आहे. ही ग्रीन कार ‘निसान जोंगा’ आहे. सध्या ‘जोंगा’ रांचीमधील धोनीच्या घराची शान वाढवत आहे. नुकतेच त्याच्या ‘जोंगा’ चे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गुरुवारी महेंद्रसिंग धोनीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जीवाबरोबर ‘जोंगा’ क्लिअर करताना दिसत आहे. सोबतच्या व्हिडिओमध्ये धोनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ‘थोडीशी मदत नेहमीच खूप पुढे घेऊन जाते, खासकरून जेव्हा तुम्हाला हे समजते की ते एक मोठे वाहन आहे’.

महेंद्रसिंग धोनी अनेकदा आपली मुलगी जीवाबरोबरचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करतो. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असल्यामुळे धोनी आणि जीवा आजकाल ‘जोंगा’ची सफाई करण्यात मग्न आहेत.

‘निसान जोंगा’ सुधारित निसान 1 टन उर्फ निसान 4 डब्ल्यू 73 मालिका ट्रक हे सैन्य वाहन होते. ज्याची रचना विशेषत: निसानने भारतीय सशस्त्र दलांसाठी केली होती. हे मॉडेल बंद करण्यापूर्वी सैन्याने बराच काळ त्याचा वापर केला. हे वाहन सामान्य रस्त्यावर दिसू शकत नाही, कारण ते केवळ भारतीय सैन्यालाच विकले गेले. सैन्याने त्याचे नाव ‘जोंगा’ ठेवले होते.

‘निसान जोंगा’ खरे तर Modified Nissan 1 Ton aka The Nissan 4W73 Series Truck ट्रक हे सैन्य वाहन होते. ज्याची रचना विशेषत: निसानने भारतीय सशस्त्र दलांसाठी केली होती. हे मॉडेल बंद करण्यापूर्वी सैन्याने बराच काळ त्याचा वापर केला. हे वाहन सामान्य रस्त्यावर दिसू शकत नाही, कारण ते केवळ भारतीय सैन्यालाच विकले गेले. सैन्याने त्याचे नाव ‘जोंगा’ ठेवले होते.


महेंद्रसिंग धोनीने आता आपल्या नव्या पाहुण्यात काही बदल केले आहेत. विशेषत: ती हिरव्या रंगात रंगविली असून त्याचबरोबर काही नवीन वैशिष्ट्येही यात जोडली गेली आहेत. धोनीकडे वाहनांचा मोठा संग्रह आहे, पण सध्या ‘जोंगा’ हे त्याचे आवडते वाहन बनले आहे. नुकताच रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यादरम्यान धोनी त्याच कारसह स्टेडियमवर पोहोचला.

Leave a Comment