रामलीलाची चाइल्ड पॉर्नशी तुलना केल्याने प्रकाश राज वादाच्या भोवऱ्यात

विविध राजकीय विषयांवर भाष्य करणारे अभिनेता प्रकाश राज पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी रामलीलाची तुलना चाइल्ड पॉर्नशी केली आहे. ते एका टिव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात बोलत होते.

प्रकाश राज म्हणाले की, हॅलिकॉप्टरला पुष्पकविमान दाखवले जाते, त्यातून मेकअप केलेले तीन मॉडेल – राम, लक्ष्मण, सीता बनून येतात. त्यानंतर लोक त्यांची पुजा करतात. मला या सर्व गोष्टी भारतात बघायच्या नाहीयेत. हा सगळा बावळटपणा आहे.

प्रकाश राज यांच्या या वक्तव्यावर अँकर प्रश्न विचारतो की, लोक हेच बघून तर मत देतात. लोकांना याचा काहीही त्रास नाही. यावर प्रकाश राज यांनी उत्तर दिले की, लोक मत देत आहेत तर काय सोडून द्यायचे का ? असे असेल तर मग जे चाइल्ड पॉर्न बघतात, त्यांनाही बघू द्या. त्यांनाही सोडून द्या.

प्रकाश राज यांच्या या उत्तरावर अँकरने प्रतिप्रश्न केला की, तुम्ही रामलीलेची तुलना चाइल्ड पॉर्नशी करत आहात का ? यावर प्रकाश राज म्हणाले की, रामलीला सारखा कार्यक्रम आपल्या समाजासाठी योग्य नाही. यामुळे अल्पसंख्याकांमध्ये भिती निर्माण होते. मला माहिती आहे की, संस्कृती काय आहे व काय नाही. मंदिरात जाणे संस्कृती आहे, लोकांसमोर असे नाटक कशाला ? राम, लक्ष्मण, सीता यांना हॅलिकॉप्टरमधून घेऊन येणे माझ्या संस्कृतीचा भाग नाही.

प्रकाश राज यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे.

Leave a Comment