दंबग 3चा ट्रेलर तुमच्या भेटीला


बॉक्स ऑफिसवर 2010 साली अवतरला चुलबुल पांडे आणि बॉलिवूडच्या सल्लू मियाँ म्हणजेच सलमान खानला चित्रपटाने एक नवीन नाव दिले ते म्हणजे दबंग खान. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने भरपूर गल्ला जमवल्यानंतर या चित्रपटाचा 2012 साली सिक्वेल आला दबंग 2. बॉक्स ऑफिसवर या सिक्वेलने सुद्धा कमाल केली. आता तब्बल सात वर्षांनंतर या चित्रपटाच्या सीरिजमधला तिसरा भाग दबंग 3 भेटीला येणार आहे. चुलबुल रॉबिनहूड पांडे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भेटीला येणार म्हटल्यावर चित्रपटाबद्दलची उत्सुकता तर पराकोटीला पोहोचली आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एकापेक्षा एक सरस डायलॉग या ट्रेलरमध्ये सलमानच्या तोंडी दिसत आहे.

या चित्रपटाद्वारे महेश मांजरेकरांची कन्या बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सई मांजरेकर बेबी खुशी ही भूमिका साकारणार आहे. खुशीची ओळख करून देण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक नवीन मोशन पोस्टर रिलीज केले होते.
चुलबुल पांडेने या आधी रज्जो आणि दबंग 3चा खलनायक बालीचे पोस्टर्स रिलीज केले. ज्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. आता या सगळ्या कलाकारांच्या टीममध्ये सई सामील झाली आहे. या सगळ्यामुळे चित्रपटाची उत्सुकता ताणली गेली आहे पण चित्रपटासाठी डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे. दबंग 3च्या ट्रेलर मधून चित्रपटाबद्दल बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. सलमान खान फिल्म्सच्या बॅनर खाली बनत असलेल्या दबंग 3 चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभू देवाच्या खांद्यावर आहे. सलमान खान, अरबाज खान आणि निखिल द्विवेदी यांनी निर्मित केलेला चित्रपटा दबंग 3 येत्या 20 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकाच वेळेला हा चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. अनेक भाषांमध्ये रिलीज होणारा सलमानचा हा पहिलाच चित्रपट ठरेल.

Leave a Comment