ड्रेसवरून प्राइज टॅग काढायला विसरल्याने ट्रोल झाली जान्हवी


हिंदी सिनेसृष्टीतील काही कलाकार आपल्या फॅशन सेन्समुळे ओळखले जातात. त्यातच काही अभिनेत्रीचे चाहते OOTD अर्थात Outfit Of The Day वर नजर ठेवून असतात. पण नुकतीच आपल्या आउटफिटमुळे अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. एक सुंदर पंजाबी ड्रेस जान्हवीने घातला होता. पण ती या ड्रेसवर असलेल्या किंमतीचा टॅग काढायला विसरली. तिला नेमक्या याच गोष्टीमुळे ट्रोल करण्यात येत असून तिची सोशल मीडियावर थट्टा उडवण्यात येत आहे. अनेकांनी तर किंमतीचा टॅग नसेल तर विकत घेतलेला हा ड्रेस परत करू शकत नसल्यामुळे तिने टॅग काढला नसल्याचे म्हटले आहे.


जान्हवीचा एक व्हिडीओ फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला. तिने यात पिवळ्या रंगाचा सूट आणि प्लाझो सेट घातला होता. जान्हवी व्हिडीओत तिच्या प्लाटे क्लासमधून बाहेर निघून आपल्या गाडीकडे जाताना दिसते. पाठीमागून जान्हवीला पाहताना तिच्या आउटफिटकडे नजर जाते तेव्हा किंमतीचा टॅग दिसतो. जान्हवीच्या या व्हिडीओनंतर अनेकांचे असे म्हणणे आहे की, फक्त यासाठी जान्हवीने टॅग काढला नाही कारण ते कपडे मिंत्रा टॅगशिवाय परत घेणार नाही.

नुकतीच जान्हवी कपूरने ‘दोस्ताना 2’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. ती कार्तिक आर्यनसोबत या चित्रपटात दिसणार आहे. प्रियंका चोप्रा, अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम स्टारर दोस्ताना चित्रपटाचा हा सीक्वल आहे. याशिवाय जान्हवी लवकरच ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ चित्रपटातही दिसणार आहे.

Leave a Comment