‘हाऊसफुल ४’चे ‘छम्मो’ गाणे तुमच्या भेटीला


सध्या तगडी स्टारकास्ट असलेला ‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून चित्रपटाच्या धमाल ट्रेलरनंतर यातील ३ गाणी आत्तापर्यंत रिलीज करण्यात आली आहेत. सध्या सोशल मीडियावर यापैकी ‘बाला’ गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. त्यातच आता या चित्रपटातील ‘छम्मो’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याची लिंक अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.


या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सेनॉन, क्रिती खरबंदा, पुजा हेगडे, हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सर्व कलाकारांचा धमाल डान्स ‘छम्मो’ गाण्यात पाहायला मिळतो. भव्यदिव्य अशा सीतमगड येथील राजवाड्यात या गाण्याचे शूटिंग करण्यात आले आहे.

या गाण्याचे बोल समीर अंजान यांनी लिहिले आहेत. तर, हे गाणे सौहेल सेन, सुखविंदर सिंग, श्रेया घोषाल आणि शादाब फरीदी यांनी गायले आहे. सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चित्रपटाची संपुर्ण टीम व्यस्त आहे. सध्या ही टीम प्रमोशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावत आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.