या गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये साजरी होणार दिवाळी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प गुरूवारी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. हे आयोजन भारतात दिपोत्सव साजरा करण्याच्या तीन दिवस आधी करण्यात येत आहे.

व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प तिसऱ्यांदा दिवाळी साजरी करत आहेत. दिवाळी साजरी करण्याची परंपरा बराक ओबामा यांनी 2009 मध्ये केली होती. व्हाइट हाऊसमध्ये दीप लावून ट्रम्प दिवाळी साजरी करतील.

2019 मध्ये ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधील ओवल कार्यालयात पहिल्यांदा दिवाळी साजरी केली होती. यावेळी त्यांच्या प्रशासनातील सदस्य आणि भारतीय-अमेरिकन समुदायातील काही नेते उपस्थित होते. मागील वर्षी ट्रम्प यांनी अमेरिकेतील भारताचे उच्चायुक्त नवतेज सिंह सरना यांना बोलवले होते.

अमेरिकेतील काही भागात दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबोट यांनी भारतीय-अमेरिकन नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

Leave a Comment